'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday 22 December 2011

सेन्सॉर धुडकावणा-या लेखण्या

रस्त्यावर उतरून लढणा-या देशभरातल्या स्त्रियांचं लिखाण मराठीत येतंय. मनोविकास प्रकाशनने हे शिवधनुष्य उचललंय. तब्बल ४० पुस्तकांची भारतीय लेखिका नावाची ही मालिका आहे. पैकी ११ पुस्तकं तयार झालीत. त्यांची लोकप्रभामधून करून दिलेली ही ओळख...


एखादं गाव किती शहाजोग आहे, याचा कानोसा घ्यायचा असेल तर पाणवठ्यावर गावातल्या बायका काय काय बोलतात ते ऐकावं असं म्हणतात. मोठ्या समाजाबद्दलही तसंच म्हणता येईल. कुठलाही समाज किती निकोप आहे किंवा प्रगतीची किती शेखी मिरवतो, हे समजून घ्यायचं असेल तर त्या समाजातील स्त्रियांचं लिखाण वाचावं. अगदी लख्ख प्रतिबिंब उभं राहील. हे लिखाण म्हणजे समाजाचा आरसाच. पण बाई बोलते म्हटल्यावर लगेचच कान टवकारतात. आपल्याविषयीच काही तरी बडबडतेय असं लक्षात आलं तर अगोदर तिचं तोंड बंद केलं जातं. गपगुमान राहण्याची तंबी दिली जाते. खेडेगावातल्या एखाद्या छोट्या कुटुंबापासून तर जगभरातल्या प्रगत, अप्रगत समाजात हेच चित्र दिसतं. 

Saturday 3 December 2011

सोयराबाईचा विटाळ सुटो...

नवशक्तिने आज महापरिनिर्वाणदिन विशेष पुरवणी काढलीय. भीमराव की बेटी हूँ मै!’ अशी थीम आहे. त्यात माझाही संत सोयराबाई आणि कुटुंबावरचा लेख छापलाय...
भल्या पहाटे सावळ्या विठूरायावर दूध, दही, मधादी पंचामृताचा अभिषेक सुरू आहे. टिपेचा सूर लावून बेणारे पुरुषसूक्त म्हणतायत. त्याची गंभीर लय गाभा-यात आवर्तनं घेतेय. परिचारकांनी गरम पाण्यानं भरलेली चांदीची घागर नुकतीच आणून ठेवलीय. आता ते धुपाटण्यात धूप नीट जुळवून ठेवतायत. बडवे देवाच्या भरजरी वस्त्रांच्या घड्या उलगडतायत.

Thursday 1 December 2011

अत्रे आणि शिवसेना

आठवड्याभरापूर्वी पेपरात एक बातमी वाचली. शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रे! मला पीएच.डी.चे दिवस आठवले. पत्रकार अत्रेअसा संशोधनाचा विषय होता. सुरुवातीलाच मी वरील बातमीच्या निष्कर्षावर आलो. पण पुढं वाचत गेलो, तसं लक्षात आलं की, अरे ही तर महाराष्ट्राची परंपरा आहे. कॉपीची म्हणा हवी तर. (साप्ताहिक लोकप्रभाततशा आशयाचा मी एक लेखही लिहिला होता) महाराष्ट्रप्रेमाच्या भुतानं ज्याला झपाटलं तो अशाच प्रकारच्या गर्जना करणार न् लिहणार. मग ते लोकमान्य टिळक असोत, शि. म. परांजपे असोत, अच्युतराव कोल्हटकर असोत, प्रबोधनकार ठाकरे असोत, राम गणेश गडकरी असोत की आचार्य अत्रे..!
परवा भल्या सकाळीच पोराला घेऊन शिवाजी पार्कावरच्या श्रॉफ हाऊसमध्ये गेलो होतो. तिथं अत्रेकन्या शिरिष पै राहतात. आचार्य अत्रे इथंच राहायचे. हॉलमधला अत्र्यांचा अर्धपुतळा पाहून मनात पुन्हा आलं, कदाचित हे शिवसेनाप्रमुखांचं, अत्र्यांचं घर असतं...पण इतिहासात जर, तर, कदाचित नसतात...


शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रे!, अशी बातमी नुकतीच
वर्तमानपत्रात वाचली. आता सुमारे अर्धशतकानंतरहरपले श्रेय शोधण्याची धडपड काअसा विचार यानिमित्तानं मनात आल्याशिवाय राहिला नाही. खरं तर प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे ही मराठी माणसाची दोन दैवतं. महाराष्ट्राकडं हे दोन महारथी नसते तर, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढा जिंकणं अशक्य होतं, हे प्रत्येक मराठी माणूस जाणतो. हा लढा लढवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचं जे पंचायतन होतं, त्यात अग्रभागी होते, ठाकरे आणि अत्रे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांच्या लेखण्या आणि वाण्या वीजेप्रमाणं कडाडल्या. जनमानसाला त्यांनी खडबडून जाग आणली. म्हणून तर मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला.