'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday 20 September 2011

साहेब


राजकारण म्हणजे गुंडापुंडाचा, काळं बेरं करणा-या, चालू लोकांचा धंदा. राजकारणाच्या नादाला भल्या माणसानं लागू नये, असं म्हणतात. मग मनात विचार येतो, राजकारणात कधी चांगली माणसं नव्हती का? नाहीत का? डोळ्यापुढं नावंच येत नाहीत. बोटावर मोजण्याएवढीही नाहीत. पण असा एक भला माणूस महाराष्ट्राच्या राजकारणानं पाहिला होता. मी पाहिला होता. त्यांचं नाव साहेबराव बुट्टेपाटील. पुण्यातल्या खेड तालुक्याचे माजी आमदार.

Friday 16 September 2011

शाहिरांच्या देशा


आता कुठं जरी खुट्ट झालं की काही सेकंदात जगभर बातमीचा वणवा पसरतो. ही सगळी मीडियाची किमया. भारतभर लोकपाल आंदोलन चेतवणा-या अण्णांनीही मीडियाला श्रेय दिलं. पण ५० वर्षांपूर्वीचा मीडिया काय होता? तो लोकांपर्यंत किती पोहोचत होता? असा विचार करू लागलो तर समोर येतं, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन.
संयुक्त महाराष्ट्राचा हा लढा गावोगावी पोहचवण्याचं, मराठी मनं पेटवण्याचं ऐतिहासिक काम एका प्रभावी मीडियानं केलं. हा मीडिया म्हणजे लोकशाहीर आणि त्यांची गगन भेदून टाकणारी शाहिरी. या शाहिरांना टाळून महाराष्ट्राला पुढं जाताच येणार नाही.

Thursday 15 September 2011

शांताबाई


शांता शेळकेंची एक आठवण आहे. त्या माझ्या गावच्या. म्हणजे, मी त्यांच्या गावचा. मंचरचा!
पुण्यात राजन खान नावाचे एक अत्यंत खटपटे गृहस्थ आहेत. एसपी कॉलेजात असताना मी शेपटासारखं त्यांच्या मागे मागे फिरे.

एकदा ते म्हणाले, 'आपापल्या तालुक्याची इत्थंभूत माहिती देणारं फोन डिरेक्टरी टाईप एक पुस्तक आपण लोकांना देऊ. मोफत. तू तुझ्या तालुक्यापासून सुरुवात कर.' मी म्हणालो, आणि त्यासाठी पैसे? म्हणाले, आपण जमवायचे. म्हणजे तू. अहो, मला कोण ओळखणार आणि कोण पैसे देणार? म्हणाले, जा. आता नोकरी शोधत हिंडालच ना, मग पहिल्यांदा 'नकार झेलायला' शिका. जाहिरातीही गोळा करा. 

Wednesday 14 September 2011

संगणकातला मराठी माणूस

शिवाजीराव आढळराव पाटील तेव्हा खासदार नव्हते. ते होते, संगणक क्षेत्रातले यशस्वी मराठी उद्योजक. महाराष्ट्र टाइम्सच्या अविष्कार पुरवणीत मी त्यांची यशोगाथा लिहिली होती. 

                                                         (कृपया फोटोवर क्लिक करा)
                                                      

Monday 12 September 2011

आमदार

पत्रकारितेचा कोर्स करत असताना आमुची नवदृष्टी लोकप्रतिनिधींवर अर्थात आमदारांवर पडली. पुढारी, राजकारणी, गेंड्याच्या कातडीचे, सरड्याप्रमाणे रंग बदलणारे अशा विशेषणांनीच त्यांची शाळकरी वयापासून ओळख झालेली.

मनात विचार आला, ही मंडळी करतात तरी काय? जुन्या आमदारांनी काय केले असेल? तेही असेच असतील काय? त्या काळची परिस्थिती कशी असेल? झाले, लगेच कामाला लागलो. आजीमाजी आमदारांचा शोध सुरू झाला. खेड, आंबेगाव, जुन्नर हे कार्यक्षेत्र. या तालुक्याच्या पहिल्या आमदारापासूनची माहिती जमवायला सुरुवात केली. अगदी आटापीटा केला.

एखादा वयोवृद्ध आमदार गतकाळातल्या आठवणी तासन् तास सांगत बसायचा. एखाद्या दिवंगत आमदाराच्या मुलाकडं वडिलांचा साधा फोटोदेखील नसायचा. तर एखादे आजी आमदारसाहेब स्वत:बद्दलची माहिती सांगायलाही अनेक हेलपाटे मारायला लावायचे.
पण कंटाळलो नाही. नेटानं माहिती जमवत राहिलो.
विधानसभा लायब्ररीत गेलो. ग्रंथपाल म्हणाले, आमच्याकडंही माहिती नाही हो. खरं आपल्याकडं असं काम व्हायला पाहिजे. राजस्थान विधानसभेच्या ग्रंथालयात आमदारांची किती तरी व्यवस्थित, अपडेट माहिती मिळते. इथं काही आमदारांनी स्वत:विषयी जुजबी माहिती भरून दिलेले काही फॉर्म मात्र मिळाले.

स्वातंत्र्याची ५० वर्षे

स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली तेंव्हा आम्ही विद्यार्थी'दशेत' होतो. तेव्हाच आम्ही आमचे मौलिक विचार व्यक्त करू लागलो होतो. 'पिंपरी-चिंचवड टुडे'च्या दिवाळी अंकातला हा त्या काळातला ऐतिहासिक लेख..smile

                                                           (कृपया फोटोवर क्लिक करा)

                                                         
                                                         (कृपया फोटोवर क्लिक करा)

Sunday 11 September 2011

विघ्नकर्ता-विघ्नहर्ता

आज गणपतीविसर्जन. सर्वांनी जड अंत:करणानं बाप्पाला निरोप दिलाय. आजच्याच मटात स. रा. गाडगीळ यांच्या लोकायत नावाच्या पुस्तकाविषयी छापून आलंय. यात गणपतीच्या सांस्कृतिक प्रवासाची तोंडओळख करून देण्यात आलीय. श्रीगणेशाचा विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता हा प्रवास, त्यामागचं राजकारण याचा उहापोह करण्यात आलाय. यानिमित्तानं मला चार वर्षांपूर्वी लिहिलेल्या माझ्या लेखाची आठवण झाली. श्रीगणेशाचं मूळ रुप शोधणा-या या लेखाच्या चार पानांपैकी दोनच सापडली. त्यातला हा मजकूर...