पुणे जिल्ह्यातला जुन्नर परिसर म्हणजे इतिहासप्रेमी आणि संशोधकांची पंढरी.
(कृपया फोटोवर क्लिक करा)
(कृपया फोटोवर क्लिक करा)
(कृपया फोटोवर क्लिक करा)
हा मावळपट्टा जितक्या वेळा पाहाल तितक्या वेळा वेड लावेल. लाखो वर्षांपूर्वींच्या ज्वालामुखीच्या राखेपासून, हजारो वर्षांपूर्वी कातळात कोरलेल्या शेकडो बौधलेण्यांपासून, सातवाहनांच्या नाणेघाटातल्या जकातीच्या प्राचीन रांजणांपासून ते शिवरायांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यापर्यंत. किती पाहावे अन् किती डोळ्यांत साठवावे!
लेण्यांमधल्या बौद्ध भिख्खूंनी इथल्या औषधी वनस्पतींनी असाध्य व्याधींवर इलाज केले. इथल्याच नाणेघाटानं महाराष्ट्र देश सातासमुद्रापलिकडच्या परदेशाशी जोडला. उत्तरेकडून येणारी सैन्यदळं याच मार्गानं महाराष्ट्रात उतरली. इथल्या ‘जुन्नरी’ कागदावर हजारो पोथ्या लिहिल्या गेल्या. गो-या साहेबालाही या प्रदेशाचा मोह पडला. इथल्या हरिश्चंद्र गडावरच्या कोकणकड्यावरून दिसलेलं वर्तुळाकार इंद्रधनुष्य पाहून इंग्रज कलेक्टर वेडा झाला न् त्यानं इथं प्रतिमहाबळेश्वरच उभारायला सुरुवात केली. इथल्या नानाविध वनस्पती पाहून अधिकारी गिब्सन हरखला न् त्यानं कुटुंबासह इथं कायमचा मुक्काम ठोकला. तोच पुढं भारताचा पहिला वनाधिकारी ठरला.
असं काय काय न् काय काय. अशा या जुन्नर देशाची माहिती विद्यार्थीदशेत मिळवीत होतो. मुंबईच्या ‘अपूर्व क्रिएशन’चे सुभाष बाणखेले हा ‘आयडियाबाज’ माणूस. तो म्हणाला, या माहितीचं आणि फोटोंचं सुंदर कॅलेंडर बनवू. बनवलं. ‘अपूर्व दिनदर्शिका २०००’. त्याची काही कात्रणं गेल्या आठवड्यात हाताशी लागली...
(कृपया फोटोवर क्लिक करा)
(कृपया फोटोवर क्लिक करा)
(कृपया फोटोवर क्लिक करा)
(कृपया फोटोवर क्लिक करा)
No comments:
Post a Comment