आयुष्यातला एक योगायोग असा की पत्रकारितेच्या एवढ्याशा आयुष्यात मराठीतले नामवंत संपादक 'बॉस' म्हणून अनुभवले. कुमार केतकर, अरूण टीकेकर, निखिल वागळे, भारतकुमार राऊत, विजय कुवळेकर, यमाजी मालकर आणि थोर पत्रकार अनंत भालेराव यांचे चिरंजीव, निशिकांत भालेराव. ‘तुमचा आजचा अग्रलेख काही धड नाही’, असं बिनदिक्कत तोंडावर सांगणा-या आपल्या रिपोर्टरशी भालेराव अत्यंत शांतपणे चर्चा करायचे. ‘रंग दे बसंती’ सिनेमा पाहून आल्यावर मी उस्फूर्तपणे ‘सकाळ’च्या पुरवणीत अनुभव लिहिला. तो वाचून काही न बोलता यांनी नोटीस बोर्डावर ‘चांगलं’ लिहिल्याबद्दल ‘लेखी कौतुक’ केलं होतं. तोच हा अनुभव...
कृपया फोटोवर क्लिक करा
No comments:
Post a Comment