'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Saturday 18 February 2012

मी काळा विठोबा झालो !


सध्या मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत एका जगप्रसिद्ध चित्रकाराचं प्रदर्शन सुरू आहे. तुम्ही गॅलरीत गेलात तर भिंतींवरच्या पेंटिंग्जच्या अगोदर तुमचं लक्ष वेधून घेईलजमिनीवरची एक मोठीशी लाकडी चौकट. त्यावरचा भोपळ्याएवढ्या आकाराचा लाकडी गोळा. त्याशेजारी दुसरी लाकडी चौकट. जरा उलटी करून ठेवलीय. त्यावरही एक मानवी डोक्याच्या आकाराचा लाकडी गोळा. 
बारकाईनं पाहिलं तर जणू एखादा योगीच पदमासन घालून बसलाय. आणि हॉलच्या मध्यभागी आहेएका कोनावर उभी केलेली लक्षवेधक काळी लाकडी चौकट. तिच्या डोक्यावर आहेत, तीन लहान गोळ्यांची उतरंड. ती पाहिल्यावर मात्र आपल्याला लगेचच कमरेवर हात ठेवून उभ्या राहिलेल्या सावळ्या विठ्ठलमूर्तीची आठवण होते.


मग भिंतीवरच्या पोर्टेटमध्ये हातात पताका घेऊन धावणारे उल्हसित वारकरी, वायूवेगानं धावणारा माऊलींचा अश्व आदी पाहून हे प्रदर्शन नक्कीच पंढरीच्या वारीशी संबंधित असावं, असं वाटू लागतं. ते खरंही आहे. कारण आधुनिक चित्रकलेचे रंग दाखवणा-या या प्रदर्शनाचा आत्मा आहे, तो सावळा विठ्ठलच.

या सर्व कलाकृती साकारणारे आणि त्यांचं प्रदर्शन आयोजित करणारे चित्रकार आहेतहॉलंडमधले. त्यांच्या या प्रदर्शनानं युरोपातली बहुतेक शहरं गाजवलीत. परदेशी नागरिक ही चित्रंशिल्पं पाहून भारावून जातात. हे भारावलेपण केवळ या चित्रांच्या दर्शनातून आलेलं नसतं. तर या चित्र-शिल्पांमागे असलेल्या विचारांतून ते आपसूकच येतं. ते विचार आहेत, समतेचे. विश्वबंधुत्वाचे. आणि ते सांगितलेत  महाराष्ट्रातल्या संतांनी. ज्ञानदेव-तुकोबांनी.
संतांचे हे विश्वचि माझे घर’ असा संदेश देणारे, विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागणारे विचार हा चित्रकार आपल्या कलेतून जगभर पोचवतोय. इथल्या मातीत रुजलेले हे विचारकोंब सातासमुद्रापलिकडं नेणा-या या चित्रकाराचं नाव आहेभास्कर हांडे!


हांडे आहेत, ज्ञानोबा-तुकोबा माऊलींच्याच भूमीतले. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरच्या उंब्रज गावचे. हा मराठमोळा कलाकार गेली ३० वर्षे युरोपातलं कलाक्षेत्र गाजवतोय. चित्र-शिल्पातले विविध प्रकार लीलया हाताळतोय. पण त्याची मुळं आहेतउंब्रजच्या शेता-शिवारात. ती त्याला इथं खेचून आणतात.


ते म्हणतात, एखादं दृश्य साकार करायचं असेल तर माणूस नाचणंवाद्य वाजवणंगाणंअभिनय अशा माध्यमांचा आधार घेतो. कथाकवितानाटक लिहितो. तर चित्रकार हेच दृश्य आपल्या चित्र-शिल्पातून उभं करतो. दृश्य, प्रतिमा पहिल्यांदा माणसाच्या मनात उभी राहते. मग तो कलाकार असो किंवा सामान्य माणूस. अगदी कुठलाही आकार नसणारा निर्गुण निराकार देवही मग सगुण साकार होतो.

इथल्या कष्टकरीभोळ्या भाबड्या जनतेनं असाच आपला देव आपणच शोधून काढलाय. तो म्हणजे पंढरीचा सावळा विठूराया. हा सावळा विठूराया म्हणजे समतेच्या विचाराचं प्रतिक. हे प्रतिक मी जगभर घेऊन फिरतोय. अर्थात या सा-या प्रवासाचा प्रेरणास्त्रोत आहेततुकोबा!’


अगदी उंब्रज ते हॉलंड हा प्रवास सुरू झालातेव्हापासून तुकोबाराय हांडेंची सोबत करतायत. पोटासाठी हांडे मुंबईत आले. सिनेमाची पोस्टर्स रंगवता रंगवता आर्ट कॉलेजचे विद्यार्थी बनले. विद्यार्थी असताना त्यांना एक राज्यपुरस्कार मिळाला. शब्द आणि चित्राची सांगड घालून जाहिरात तयार केल्याबद्दल. ही जाहिरात होतीप्रौढ साक्षरता अभियानाची. इथंही तुकोबाच हांडेंच्या मदतीला धावले. त्यांच्या अभंगातल्या ‘एकमेका सहाय्य करूया या ओळी जाहिरातीत एकमेका सहाय्य करू अवघे बनू साक्षर’ अशा झाल्या. यामुळं उत्साह दुणावला. खरं तर तुकोबा त्याही आधी हांडेंच्या सोबत होते. आई-वडीलनातेवाईकशेजारी-पाजारी वारकरी. शाळकरी वयातच तुकारामबावांची गाथा वाचण्यात आली. पण तुकोबा सदेह साकार झाले ते दत्ता महाडिक पुणेकरसह चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशात. संत तुकाराम या वगातून. हे तुकारामदर्शन हांडेंच्या मनात ठसलं. तुकारामांचे शब्द विविध प्रतिमाप्रतिकंयांच्या रुपात डोळ्यासमोर फेर धरू लागले.

रेखाटनंचित्रशिल्पमुद्राचित्रसिल्कस्क्रिन यांच्या माध्यमातून नवी रुपं धारण करू लागले. हातून खूप काम झालं. शेकडो प्रदर्शनं झाली. कलाजगतातून वाहवा मिळाली. आज हांडे रेंम्ब्राटव्हिन्सेट व्हॅनगॉगपिट माँद्रिआन या थोर कलाकारांच्या कलेचा वारसा जपणा-या देशांमध्येचित्रशिल्पकारांमध्ये सहजपणे वावरतायत. पण त्यांच्यात हांडे वेगळे उठून दिसतायतते तुकोबांमुळं.

तुकोबांचे अभंग त्यांनी चित्र, शिल्पबद्ध केलेत. आतापर्यंत जवळपास पाचशेहून अभंग झालेत. अजून सुरुच आहेत. यातूनच निर्माण झालं, तुझे रुपमाझे देणे’ हे प्रदर्शन. त्यात सुरुवातीला उल्लेख केलेली लाकडी चौकट म्हणजे सामाजिक विचार बांधणीचा पाया. तो विचार घेऊन जगणारा माणूस. दुसरी योग्याची चौकट म्हणजे महान योगी, ज्ञानियांचा राजा संत ज्ञानेश्वरांची. विठोबाची काळी चौकट तर एक जगप्रसिद्ध शिल्प बनलंय.
यातील बहुतेक कलाकृती म्हणजे तुकोबाच्या अभंगातून व्यक्त झालेल्या शब्दांची रुपं. या कलाकृती पाहून हांडेंच्या परदेशी मित्रांना तुकोबांविषयी उत्सुकता वाटली. मग आपोआपच ते तुकोबांच्या प्रेमात पडले. हांडेची ही चित्र-शिल्प पाहून हान्सप्लोम्पलेओफान साल्म या डच मित्रांनी तसंच काही पोलीश मित्रांनी तुकाराम महाराजांच्या अभंगांची त्यांच्या भाषेत भाषांतरं केलीत. लेझॅक बोरोव्हस्की या पोलिश प्राध्यापकांनी तुकोबा समजून घेण्यासाठी मराठीच शिकण्याचा ध्यास घेतलाय.

अर्थात ही भाषांतरं झालीत दिलीप चित्रेंनी अनुवादीत केलेल्या इंग्रजी अभंगांवरून. तुकोबांचे अभंग जागतिक स्तरावर नेणारे बिनीचे शिलेदार म्हणजे दिलीप पुरुषोत्तम चित्रे. ‘सेज तुका’ नावानं त्यांनी केलेल्या इंग्रजीत अनुवादातून तुकोबा जगभर पोहोचले. खरं तर त्यांच्याही अगोदर ही अनुवादाची सुरुवात केली कवी अरुण कोलटकरांनी. चित्रे आणि कोलटकर हे हांडेंचे जीवाभावाचे मैतर. पुण्यात चित्रे, कोलटकरअशोक शहाणे आदी फकीर मंडळी सापडण्याचं हमखास ठिकाण म्हणजेभास्कर हांडेंचं औंधमधलं घर. हांडेंचं हे तीन मजली घर म्हणजेच प्रसिद्ध ‘वैश्विक आर्ट गॅलरी.

खरं तर हांडे हे कोलटकरांचं फाईंडिंग आहेअसं म्हटल्यास वावगं ठरू नये. हांडेच्या पहिल्या पुरस्कारप्राप्त जाहिरातीचे परीक्षक कोलटकरच होते. हांडेंच्या पहिल्या नोकरीची मुलाखतही कोलटकरांनीच घेतली. हांडेंना कलाजगतात इंट्रोड्यूस केले ते कोलटकरांनीच. आणि दोघांना जोडणारा प्रेमाचा धागा एकच. तो म्हणजेतुकाराम! तुकारामांच्या शब्द-चित्रांचा उत्कृष्ट मेळ घालायला हांडे कोलटकरांकडूच शिकले. तर लेखकजागतिक साहित्य यांचा परिचय अशोक शहाणेंमुळं झाला.
हो, आणखी एक. अगदी कालपरवापर्यंत चित्र, शिल्प, साहित्य, सिनेमा यांतून केवळ क्षमाशील, सोशिक तुकोबा लोकांसमोर उभे राहिले होते. तुकोबांची चीडअस्वस्थतासंतापतडफ व करारीपण त्यात चुकूनही डोकावत नव्हतं. असे तडफदार तुकोबा हांडेंनी चितारले. मार्दव आणि काठिण्य यांचा समतोल साधलेले तरुण तुकोबा आता हांडेंच्या पेंटिग्जमधून पाहायला मिळतात. संतसज्जनांच्या पायावर डोके ठेवणारे आणि दुष्टदुर्जनांच्या मस्तवालपणावर लत्ताप्रहार करणारे हे तुकोबा आता सामान्य जनतेतही पुन्हा एकदा रुजलेत.

हांडे सांगतात, ‘तुकोबांच्या संपूर्ण गाथेत प्रतिमांचा प्रचंड सुकाळ आहे. त्यांच्या ओघावत्या भाषेतूनचिकित्सक नजरेतून उभ्या राहिलेल्या प्रतिमाप्रसंगरुपकंउपमा इतक्या काही अप्रतिम आहेतकी माझ्या हातून आपोआप चित्र-शिल्प साकारत राहिली. अभंगातील प्रत्येक शब्दागणिक एकेक रुप डोळ्यापुढं उभं राहतं. उदा.


‘‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी।
कर कटेवरी ठेवूनिया।।
तुळशीहार गळाकासे पितांबर।
आवडे निरंतर हेचि ध्यान।।’’
हा तुकोबांचा अभंग म्हणताना प्रत्येक वारक-याच्यासामान्य माणसाच्या डोळ्यासमोर सावळा विठूराया सहज साकार होतो.
जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥
 या अभंगातली रुपकं इतकी बोलकी आहेतकी शब्द उच्चारताना मन भरून येतं. तुकोबारायांनी वर्णन केलेल्या प्रतिमा डोळ्यासमोर उभ्या राहतात. जणू प्रत्यक्ष विठोबाच या प्रतिमांची रुपं घेऊन उभा राहतो.

तुकोबारायांनी वर्णन केलेल्या विठूरायाच्या लाघवी वर्णनासोबतच तुकोबांनी स्वत:लाही सोलून घेतलं आहे.
‘‘मीचि मज व्यालो । पोटा आपुलिया आलो।।
आता पुरले नवस। निरसोनी गेली आस।।
किंवा
‘‘अणूरेणुया थोकडा। तुका आकाशाएवढा।।’’
तसंच
‘‘आपुले मरण पाहिले म्या डोळा।
तो जाला सोहळा अनुपम्य।।’’
आदी तुकोबांच्या अभंगांमधून डोळ्यासमोर उभ्या राहणा-या प्रतिमा हांडेंनी ‘तुझे रुप माझे देणे’ प्रकल्पात साकारल्या आहेत.हांडे म्हणताततुकोबांच्या अभंगरचना म्हणजे वैश्विक कल्पनांची अक्षरशखाण आहे. त्याचा प्रत्येक थर उचकटून पाहताना त्यांच्या पारदर्शकतेची कल्पना येते. आणि या पारदर्शकतेला भावभावनांचा पोत जोडलेला आहे. तो मनुष्याला रात्रंदिवस जगताना आधार देत असतो वा पुढं सरकवत असतो.

डॉ. सदानंद मोरे तर तुकारामांना ‘संस्कृतीपुरुष’ म्हणतात. आणि तुकोबांची ही संस्कृती जागतिक आहे. 
हांडे पुढं म्हणताततुकोबांचा सर्वधर्म समभावाचा संदेश भारतीय घटनेचा पाया तर ठरला आहेच पण तो एक वैश्विक विचार आहे. परदेशात असताना मी नेदरलँडच्या उदारमतवादी विचारसरणीचा मागोवा घेतला. तर मला तुकोबांचं नातं स्पिनोझाच्या तत्वज्ञानाशी जुळलेलं आढळलं. पाश्चिमात्य शास्त्रज्ञांपैकी स्पिनोझाचा विचार हा पौर्वात्य विचारसरणीशी जास्त मिळताजुळता  आहे.’’

स्पिनोझानं १९७७ साली ‘ETHICS’ नावाचं लॅटीन भाषेतलं पुस्तक लिहिलं. नैतिकता म्हणजेच देव हे त्याचं सूत्र. बायबलनं वर्णन केल्यापेक्षा हा देव वेगळा. त्यामुळं या पुस्तकावर बंदी आली. पण नंतर पाश्चिमात्यांनी हा विचार उचलून धरला. आता तुकोबा आणि स्पिनोझा यांच्यात साम्य असं आहे कीतुकोबांच्या आणि इतर संतांच्या विचारांची मदत शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारताना झाली. या संत विचारांतून शिवरायांनी सर्वधर्म समभावाचा आदर्श घेतला. त्यातून स्वराज्याला जनमानसाचा आधार मिळाला. तसाच आधार वसाहतवादाच्या काळात स्पिनोझाकडून पाश्चिमात्य राज्यकर्त्यांना मिळाला. अमेरिकेतली देवाची संकल्पना ही स्पिनोझाच्या देव तत्वावर आधारलेली आहे.

वसाहतवाद्यांमुळं त्याचा प्रसारअमेरिकाऑस्ट्रेलियाकॅनडा येथील जनतेत झाला. या देशांतल्या विचारवंतांनाही स्पिनोझाकडून प्रेरणा मिळाली. त्यातून उदारमतवाद्यांनी धर्मवेडाचं भूत रोखलं. अगदी इंग्लडसारख्या देशातही उदारमतवादी लोकांची संख्या वाढली. त्याचा परिणाम म्हणून वसाहतवाद्यांच्या विरोधात २०व्या आणि २१व्या शतकात उदारमतवादी सरकारांची स्थापना झाली. आजही सर्व वंशवादीफॅसिस्टहुकूमशाही विचारसरणीला मागं सारत या विचारांची आगेकूच सुरू आहे. हे उदारमतवादी विचार महाराष्ट्रातल्या संतांनी आठशे-नऊशे वर्षंपूर्वीच सांगून ठेवले आहेत. इथल्या समाजात ते रुजले आहेत.

या विचारांचं सार म्हणजे स्वत:च देव ही संकल्पना उभी करणं. ती तर मराठी संतांनी कधीच उभी केली होती. मग अगदी ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी’ असं संत सावता माळ्यानं म्हटलेलं असो की देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार’ असं संत नरहरी सोनाराचं हातातल्या कामालाच देव माननं असो. स्पिनोझा म्हणतो निसर्ग देव आहे. आणि देव म्हणजेच निसर्ग आहे. तुकोबा तेच तर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ या अभंगातून सांगतात.

मन आणि विश्व यात कुठलं तरी एकजातीय तत्व भरलेलं आहेअसं स्पिनोझाला वाटत होतं. त्याला विश्वातल्या एकत्वाचा ध्यास होता. हाच ध्यास ज्ञानदेवांना होता. ज्ञानदेवांच्या अनुभवामृतातील ओव्यांमध्ये तो समोरासमोर येतो. ज्ञानदेवांनी तेराव्या शतकात महाराष्ट्रात जे कार्य केलंतेच स्पिनोझानं देव संकल्पनेबाबत युरोपात केलं.

कलाकार आपल्या कल्पकतेतून दृश्ये उभी करतो. आणि त्यातून समाजाला ज्ञानसंदेश देतो. ज्ञानदेवांनी तेराव्या शतकात अनुभवामृतातून अशी अनेक दृश्यांची उभारणी केली आहे. उदा.
जांभे वाटौनी रसु।
काहडावा बहुवसु।
कालवुनि आळसु ।
मोदळा पाजावा।
म्हणजे - जांभई पाट्यावर वाटावीतिचा पुष्कळ रस काढावात्यात आळस कालवावा आणि ते मिश्रण जाडजूड देहाला पाजावं.
किंवा
तो पाटा पाणी परतु।
पडिली साउली उलथू।
वारयाचे तांथु।
वळू सुखे।
म्हणजे - पाटातून वाहणा-या पाण्यानं मागं परतावंजमिनीवर पडलेली सावली उलथून टाकावीकिंवा वा-याचे तंतू घेऊन त्याने सुखाने दोरी वळीत बसावं.

आता विठोबा काळा का? हे हांडे अगदी सोपं करून सांगतात. म्हणजे असं पाहा, की माणूस जगतो तो असंख्य दु:खं पचवत. हालअपेष्टा सहन करत. परिस्थितीचे चटके बसले, अपमान, निराशेनं मन करपून काळं होऊन गेलं तरी तो जगत असतो. हेच चटके, टक्के-टोणपे, अनुभव, त्यातून आलेलं शहाणपण म्हणजेच कटेवर कर ठेवलेला सावळा विठोबा!’

विद्यार्थी असताना हांडेनी एक कविता केली होती. त्याच कवितेनं पुढं त्यांना वाट दाखवली.
‘‘बावरलेल्या परिस्थितीच्या कानात कळवळलो
बघ तुझ्या चटक्याने पोळून मी काळा विठोबा झालो
देह चंद्रभागेत बुडवून आलो
सर्व इच्छा संपवल्या आहेत
म्हणते कशी बस ह्या विटेवर
ठेवून हात कटेवर भोग या जागी
आरतीच्या या आगी...’’
म्हणून तर परिस्थितीची हीच आग, हीच धग, हेच चटके सोसणारे कष्टकरी जीव सावळ्या विठुरायाला भेटायला नियमित पंढरपूरला जातात. 
त्या काळ्या तत्वाशी एकरुप होतात. जगण्याशी झगडायला नवी उर्जा मिळवतात. 
आणि हीच अक्षय्य उर्जा आपल्या शिल्प-चित्रांत साठवून हांडे जगभर फिरतायत. 
जीवनाशी झुंजणा-या माणसांना देण्यासाठी. 
विठुराया त्यांना उदंड आयुष्य देवो

'नवशक्ति'तील लिंक - http://navshakti.co.in/?p=40904

No comments:

Post a Comment